अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल…

आम.नितेश राणे:विनायक राऊत यांचा 10 वर्षाचा लेखाजोखा कोरा असेल..

⚡कणकवली ता.०५-: पंतप्रधान मोदी यांनी भारत देशाचा नागरिक आपला परिवार असल्याची भावना व्यक्त केली. त्यावर देशभर मोदींचा आम्ही परिवार आहोत अशी घोषणा,आणि स्टेटस ठेवले गेले. त्यामुळे संजय राऊत यांना मिर्ची लागली आहे.२०१४,२०१९ च्या प्रत्येक निवडणुकीत याच ठाकरे,राऊत यांनी मोदी परिवाराचा फायदा घेतला आणि मनात बेईमानी आल्यामुळे आम्ही परिवार नाही असे सांगून वेगळे झाले. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कोणाला कसा न्याय द्यायचा हे अमित शहा यांना माहीत आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल. दूरदृष्टी असणारा नेता असल्याचा आम्हाला विश्वास आहे. ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील.असे ते म्हणाले.

कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते.लोक स्वतःहून आम्ही मोदी परिवार बोलत आहेत त्यावर टीका करायला संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे असा समाचार घेतला.
आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी याबाबत संजय राऊत यांनी किती तारखा दिल्या आहे.ह्यांची भांडण कमी होत नाहीत. मतदानानंतर देखील ह्यांची भांडण मिटणार नाहीत.केवळ ४/५ जागा देणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा फार मोठा अपमान आहे.छत्रपती संभाजी महाराज खासदारकीसाठी आग्रही होते.त्यांच्या घरात सुरुंग कोणी लावला? याबाबत शाहू महाराज यांचे मत फार महत्वाचे आहे.
10 वर्षात विनायक राऊत यांनी काहीच केले नाही. त्यामुळे 10 वर्षाचा लेखाजोखा कोरा असेल. प्रत्येक पानावर राणे कुटुंबीयांचा फोटो लावावा. कारण राणे यांचेवर टीका करण्यापलीकडे तुम्ही काहीच केले नाही हे जाहीर आहे.

You cannot copy content of this page