⚡वैभववाडी ता.०४-: ऊर्जा वाचवा देश वाचवा आपण आपल्या छोट्या छोट्या कृती मधून ऊर्जा वाचू शकतो अशा घोषणा देत वैभववाडी शहरांमध्ये विद्युत सुरक्षित वापर करावा व लाईनमेन दिवस असल्याने वीज वितरण कंपनीच्या वतीने जनजागृती प्रभाग फेरी काढण्यात आली.
यावेळी उपकार्यकारी अभियंता निलेश पाटील कनिष्ठ अभियंता अमोल घाडगे कनिष्ठ सहायक अभियंता राजाराम माने तुषार गावकर अमित नेर्लेकर, किशोर मर्ढेकर तुषार गाडगे लाईन मेन गणेश पाटेकर सुहास गुरव रवींद्र गुरव अधिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभववाडी मच्छी मार्केट ते वीज वितरण कंपनी पर्यंत वैभववाडी शहरात जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी वीस बचाव देश बचाव अशा वेगवेगळ्या घोषणा देत वैभववाडी शहर दुमदुमून सोडले
