⚡वैभववाडी ता.०४-: तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे शाळेचे विज्ञान शिक्षक स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यातील विज्ञान शाखेत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आविष्कार फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आला होता. विज्ञान शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या व करत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन 2023-24 साठी हा राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा गौरव वितरण सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दिनांक 3 मार्च 2024 सकाळी पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुरेंद्र हेरकळ हे होते तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसनराव कुराडे , संयोजन श्री. रंगराव सूर्यवंशी यांनी केले तर आयोजन संजय पवार यांनी केले होते.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वप्निल श्रीकांत पाटील यांचा शिक्षक भारती वैभववाडी चे अध्यक्ष श्री अविनाश शामराव कांबळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री दिनकर पाटील , सचिव श्री संजयकुमार खिमा आडे, संघटक श्री रामचंद्र शिवराम घावरे , श्री. राजाराम बिडकर सर ,पदाधिकारी व सदस्य यांच्यातर्फे स्वप्निल श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
