कळसुलकर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. विज्ञान, गणित, हरितसेना व ऊर्जा क्लब मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे पी. जी विभाग आणि वनस्पती शास्त्र संशोधन शाखेचे प्राध्यापक डॉ. उमेश पवार तसेच सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.प्रसाद नार्वेकर, सहसचिव श्री.गौरांग चिटणीस ,खजिनदार श्री.वझे ,सदस्य श्री.रविंद्र स्वार ,संचालिका सौ.टिपणीस, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष. श्री.दत्तप्रसाद गोठोसकर,माजी शिक्षक श्री. संतोष वैज,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एन पी मानकर, हरित सेना प्रमुख श्री. सूर्यकांत भुरे, गणित विभाग प्रमुख सौ.साक्षी दळवी ,ऊर्जा क्लब प्रमुख श्री.अनिल ठाकर, प्रयोगशाळा सहाय्यक श्रीम.वर्षा राजेश केसरकर सर्व विज्ञान गणित समिती सदस्य सौ.चव्हाण,श्रीम. शेर्लेकर ,सौ एस जी सामंत, श्री. सिद्धेश कुलकर्णी, श्री.गोपाळ गवस, श्री पी बी बागुल , श्रीम.निकिता मुंज ,श्री निलेश धारगळकर, श्री.टेमकर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी श्री.निलेश रौराळे, श्री.जाधव,श्री.हरेश ठाकूर तसेच फोटो ग्राफर श्री.भिसे इ.उपस्थित होते.

डॉ. उमेश पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावे व त्यांच्या उपक्रमांना व्यासपीठ मिळावे या हेतूने प्रथमच विज्ञान समिती प्रमुख सौ. सोनाली बांदेलकर व संस्था संचालिका सौ. टिपणीस यांच्या पुढाकाराने “वेध” या गणित विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले .तसेच वर्षभरातील उपक्रमात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला. राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून अविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक संस्था कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षिका गौरव पुरस्कार 2024 प्राप्त झालेल्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली उदय बांदेलकर यांचा आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक निवड यादीत सर्वप्रथम आल्याबद्दल श्रीम.पूजा मधुकर शिंदे यांचा तसेच सावंतवाडी सहकारी पतसंस्था संचालक पदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल श्री.सदानंद जाधव यांचा विज्ञान गणित समितीमार्फत सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page