⚡कणकवली ता.०१-: माजी विद्यार्थी म्हणून आमच्या शाळा नंबर 3 च्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा वामन करंबेळकर यांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले, ज्यांनी प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्या गुरु माऊलींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.खरंच आम्ही भाग्यवान आहोत.असे प्रतिपादन राजेंद्र पेडणेकर यांनी केले.
कणकवली येथे शाळा नंबर 3 च्या शिक्षिका वर्षा करंबेळकर यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सौ. वर्षा करंबेळकर, वामन करंबेळकर, परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर, भास्कर गावडे बुवा ,संजय मालंडकर, शरद मुसळे, साधना आळवे, सविता वाळके यांच्यासह,विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
सौ. वर्षा करंबेळकर यावेळी म्हणाल्या ,शाळा नंबर 3 मधून सेवानिवृत्त होत असताना या शाळेने, विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सहकारी शिक्षकांनी केलेले सहकार्य आणि दिलेले प्रेम,आपुलकी आपण विसरु शकत नाही.यावेळी १९७६/७७ च्या बॅच च्यावतीने विजय केळुसकर यांच्या हस्ते भास्कर गावडे, आणि राजेंद्र पेडणेकर आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा नंबर ३ च्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. वर्षा वामन करंबेळकर यांना सन्मानित करण्यात आले.
शाळा नंबर ३चे माजी विद्यार्थी आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गुरु माऊलींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य :राजेंद्र पेडणेकर…
