सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांचा आरोप
*💫वेंगुर्ला दि.२०-:* वेंगुर्ला शहरात सध्या भूमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे काम करताना ठेकेदारांनी रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले असून ते अद्याप बुझविलेले नाहीत. याचा प्रचंड त्रास वाहन चालक व पाद-यांना होत आहे. त्यामुळे सदर ठेकेदार अनागोंदी कारभार करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. या प्रसिद्धी पत्रकात अॅड. सातार्डेकर म्हणाले की, सदरचे खोदकाम करताना वाहतुकीसाठी लागणारे कोणतेच नियोजन ठेकेदार तसेच संबंधित प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्याच्या मधोमध खोदलेले चर त्वरित बुझवावेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधिताना भोगावे लागतील असा इशारा अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.
