मुंबई-वाशी आंबा पेटीचा दर १५० मिळण्यासाठी एकमुखी ठराव…

वेंगुर्ला येथे ट्रान्सपोर्ट पदाधिकारी व ट्रक मालक ट्रान्स्पोर्टर यांची बैठक संपन्न

*💫वेंगुर्ला दि.२०-:* आंबा पेटी भाडेवाढीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत मुंबई-वाशीचा दर प्रती पेटी मागे रुपये १५० मिळावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. येत्या दोन दिवसांत ही भाडेवाढ झाली नाही तर होणा-या परिणामास ट्रान्सपोर्टर जबाबदार राहतील अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आंबा पेटी भाडेवाडीसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट महासंघाचे पदाधिकारी व ट्रक मालक ट्रान्सपोर्टर यांची बैठक आज येथील सागर बंगला येथे पार पडली. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक मनोज वालावलकर, रामेश्वर ट्रान्सपोर्टचे मालक जैनू पडवळ, रमेश गावडे, शरद वालावलकर, वेंगुर्ला टेम्पोचालक मालक युनियन अध्यक्ष संदिप पेडणेकर, उदय चिचकर यांच्यासह ३० ते ३५ वाहन मालक उपस्थित होते. सध्या डिझेलबरोबरच स्पेअरपार्टचेही दर वाढले आहेत. तसेच इन्शुरन्सच्याही रक्कमेत वाढ झाली आहे. त्यामुळे मालकांना कसरत करतच व्यवसायकरावा लागत आहे. आंबा पेटी वाहतूक करताना हमाली, कमिशन वारणी, भाड्याचे कमिशन वजा जाता सापी रुपये ११० प्रति पेटीमागे मिळणे आवश्यक आहे. यासाठी सदरचा दर हा रुपये १५० मिळावा असे ठरविण्यात आले.

You cannot copy content of this page