महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना वेंगुर्ला एसटी आगार अध्यक्षपदी साहिल प्रभूखानोलकर यांची निवड…

*💫वेंगुर्ला दि.२०-:* महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना वेंगुर्ला एस.टी.आगार अध्यक्षपदी श्रीनिवास गावडे मित्रमंडळाचे सदस्य साहिल प्रभूखानोलकर यांची निवड झाली. त्याबद्दल श्रीनिवास गावडे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संजय जुवाटकर, सागवेकर, मंगेश मलबारी, आनंद मुळगांवकर, शशांक घाटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष हा प्रथम कार्यकर्त्याच असल्याचे प्रतिपादन श्री.गावडे यांनी केले. आपले सहकार्य नेहमी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करीत श्री.प्रभूखानोलकर यांनी सत्काराबद्दल मंडळाचे आभार मानले.

You cannot copy content of this page