*💫कणकवली दि.२०-:* कणकवली शहरातील तीन केंद्रांवर रविवार दिनांक २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला एकूण ९७६ विद्यार्थी बसणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या नियंत्रणाखाली याबाबतचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कणकवलीतील तिन केंद्रांपैकी कणकवली कॉलेजमध्ये ९ वर्ग खोल्यांमधून २१६ विद्यार्थी, एस. एम. हायस्कूल मध्ये १३ वर्ग खोल्यांमधून ३०४ विद्यार्थी तर विद्यामंदिर मधील केंद्रांवर १९ वर्गखोल्यातून ४५६ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
कणकवलीत ९७६ विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देणार…
