*शिल्पकार दादा चव्हाण आणि मालवणी कवी दादा मडकईकर यांचा होणार सन्मान*
*💫सावंतवाडी दि.२०-:* जिल्ह्यातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार स्वर्गीय अरविंद शिरसाट यांच्या जयंतीनिमित्त शिल्पकार दादा चव्हाण व मालवणी कवी दादा मडकईकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ३.३० वाजता जिमखाना मैदान टेबल टेनिस हॉल येथे हा जयंतीदिन आयोजित करण्यात आला आहे. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अरविंद शिरसाट मित्र मंडळ सावंतवाडीच्या वतीने या जयंती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार शिरसाट यांचे गेल्याच वर्षी दि.२३ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले आहे. त्यांचा जन्मदिवस दि. २५ मार्च असून, त्यांचा जन्म दिवशी मित्र मंडळाने दरवर्षी जयंती दिन साजरा करण्याचे ठरविले आहे . यावेळी शिरसाट यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर व सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हे उपस्थित राहणार आहेत. शिरसाट यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार व चित्रकार दादा चव्हाण व मालवणी कवी दादा मडकईकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अरविंद शिरसाट मित्रमंडळी व प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
