वाहतूक पोलिसांवर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न फसला;कणकवली पटवर्धन चौकातील घटना
*💫कणकवली दि.२०-:* शहरातील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांच्या अंगावर युवकाने पेट्रोल ओतून आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल त्या युवकाने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले.आणि आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला उभे असलेल्या आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांनी त्या युवकाची गचांडी पकडून त्याला पोलीस ठाण्यात आणले .पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू केली आहे.अचानक घडलेल्या या प्रकाराने कणकवली शहरासह पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
