जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

*जिमखाना येथे एरोस्पिन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केली आहे स्पर्धा

*💫सावंतवाडी दि.२०-:* एरोस्पिन स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेचे उद्घाटन आज सावंतवाडी जिमखाना हॉल येथे करण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाअध्यक्ष तथा उद्योग-व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्राध्यापक पणदूरकर, निशांत तोरस्कर, हिदायतुल्ला खान, देवा टेमकर, नियाज शेख आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page