*सिंधुदुर्ग जिल्हा व्यावसायिक पर्यटन महासंघाच्या समन्वयाने काम करु : संजू परब यांचे आश्वासन
*💫सावंतवाडी दि.२०-:* पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचिव ॲड. नकुल पार्सेकर व सावंतवाडी पर्यटन महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडीत यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची आज भेट घेतली. यावेळी सावंतवाडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे याला माझी प्राथमिकता आहे. यासाठी पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सावंतवाडीतील सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्ती आणि विशेषतः पर्यटन आणि पर्यावरणात तळमळीने काम करणाऱ्या संस्थाशी समन्वय व संवाद ठेवून हे शहर सुंदरवाडी या नावाप्रमाणेच सुंदर करण्याचा माझा संकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यावसायिक पर्यटन महासंघाच्या समन्वयाने काम करु, असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले. या भेटीवेळी सावंतवाडी शहराच्या पर्यटन वाढीबाबत आणि शहरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून सावंतवाडीत सेल्फी पाँईन्ट, नाना नानी पार्क,, पक्षीनिरिक्षण केंद्र तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी मार्गदर्शक फलक लावण्याबाबतही नगराध्यक्षानी सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
