हवामान खात्याचा अंदाज
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 व 22 मार्च 2021 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे
