विद्यार्थ्याच्या हस्ते उद्घाटन;पिंगळी मतदार संघात संजय पड़तेंचा विकासाचा धडाका
*💫कुडाळ दि.२०-:* पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मतदार संघात अंगणवाडी, प्राथमिक शाळा, रस्ते, विहिरी अशा अनेक विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आज गोंधयाळे शाळा दुरुस्ती करून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला यश आले असुन या शाळेच्या पुर्ण झालेल्या कामाचे विद्यार्थ्याच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जि प माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबनराव बोभाटे पिंगुळी जि प मतदारसंघ विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, सरपंच सौ निर्मला पालकर उपसरपंच सागर रणसिंग ग्रामपंचायत सदस्य राजन सडवेलकर, ग्रामपंचायत सदस्य सिध्देश धुरी, शिवसेना पदाधिकारी विष्णु धुरी, सुदाम करंगुटकर, गोपाळ मुंड्ये, अन्सार पटेल, केंद्र प्रमुख मराठे व सुयोग ढवण व ग्रामस्थ महीला उपस्थित होते.
