Headlines

पडीक जमिनीचा वापर कोकणी वैभव श्रीमंत करण्यासाठी करा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या दरडोई उत्पन्न वाढीवर लक्ष दिले.

⚡ओरोस ता.१०-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. केरळमधील काथ्या उद्योग आसाम मधील बांबू उद्योगांचे प्रेरणा येथील उद्योजकांनी घ्यावी. जिल्ह्यातील दोन तृतीयांश पडीक जमिनीचा त्यासाठी वापर करावा व नवे उद्योग निर्माण करून कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग आणखी श्रीमंत करावा असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.


सिंधुनगरी येथील शरद कृषी भवनांमध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. यावेळी व्यासपीठावर खादी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनजी कुमार, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण शुक्ला, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सौ नीता राणे, प्रज्ञा ढवण, गजानन गावडे, नॅसकॉम फाउंडेशनचे प्रमुख डॉ. चेतन सामंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page