⚡बांदा ता.१०-: सिंधुदुर्ग भारत स्काऊटस् आणि गाईड्स शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन बांदा नं.१ केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
५ते ७फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झालेल्या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी मातीकाम,गाठी मारणे,जंगी आरोळी, शोभायात्रा,शेकाटी अशा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय निवासी मेळाव्याचा आनंद लुटत स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होत सुयश मिळवले. शाळेच्या भगतसिंग कब पथकातील वेदांत वीर ,हर्ष निब्रे,नीरज सिध्दये,यश कल्याणकर,साईश बांदेकर, साहील बांदेकर,वेदांत चौगुले, श्रीनाथ वडर,सोहम हडफडकर,सुयश जाधव हे विद्यार्थी व प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील हे सहभागी झाले होते.
या जिल्हा मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर , शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर आदि मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी अभिनंदन केले.
