सावंतवाडीत रविवारी इनरव्हील क्लब तर्फे सूर्य नमस्कार स्पर्धेच आयोजन…

जास्तीत जास्त संख्येने महिलांनी सहभागी व्हावे: इनरव्हील क्लब तर्फे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी इनरव्हील क्लब तर्फे सूर्यनमस्कार स्पर्धेचं रविवारी दि.११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा गार्डन जवळ घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी 20 ते 40 हा एक गट व 40 च्या पुढे असा दुसरा वयोगट ठेवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त सूर्यनमस्कार जो घालेल त्यांच्यासाठी आकर्षक बक्षीस ही ठेवण्यात आलेले आहे ही स्पर्धा सात ते आठ या वेळेत शिवउद्यान जवळ होणार आहे

स्पर्धकांनी येताना पाणी बॉटल आणि मॅट आणणे आवश्यक आहे
जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या सहभागी व्हावे असे आवाहन इनरव्हील क्लब तर्फे करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page