⚡सावंतवाडी ता.०९-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ आणि सावंतवाडीतील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सावंतवाडी शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या रूग्णालयातील रूग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी व महिला शहर संघटक सौ भारती मोरे यांच्या हस्ते रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर,राघोजी सावंत, सुरेंद्र बांदेकर,बाबुराव चव्हाण, डॉ ज्ञानेश्वर ऐवळे,सुधीर धुमे,संजय पेडणेकर, विश्वास घाग,गीता सुकी, शुभांगी सुकी, ललिता सिंग,सायली होडावडेकर,प्रतिक्षा,मिशाळ,साधना मोरे,जयश्री निब्रे,पूजा नाईक, सुप्रिया गावडे, सारिका परब, मिलाग्रिन डान्टस हनुमंत मळकाजी शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये 15 गरीब होतकरू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला जाणार आहे त्याचबरोबर सावंतवाडी येथे मुख्यमंत्री चषक क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप जिमखाना येथील लाखे वस्तीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी दिली.

