विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इन्सुलीच्या व्हाईस चेअरमन पदी दीपक इन्सुलकर…

⚡बांदा ता.०८-: विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इन्सुलीच्या व्हाईस चेअरमन पदी दीपक इन्सुलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संजय सावंत यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्या नंतर सदरचे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत इन्सुलकर यांची एकमताने निवड झाली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून एम एस धुमाळ यांनी काम पाहिले.
अलीकडेच इन्सुली सोसायटीचे व्हा चेअरमन संजय सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज व्हा चेअरमन पदासाठी सभा आयोजित करून संस्थेच्या सभागृहात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी संचालक दीपक इन्सुलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने व्हा चेअरमनपदी निवड झाली. यावेळी सोसायटीचे चेअरमन आनंद राणे, माजी चेअरमन शांताराम बांदिवडेकर, हरिश्चंद्र तारी, मावळते व्हा चेअरमन संजय सावंत, संचालक बाळा बागवे, दादा परब,श्रीमती कानसे, गटसचिव अश्विनी तावडे, माजी सरपंच नंदू पालव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित व्हा चेअरमन दीपक इन्सुलकर म्हणाले, विकास सोसायटीच्या माध्यमातून घराघरात सहकारी पोहचविण्यासाठी मी प्रयत्न करेन. गेली चौदा वर्षे मी संचालक म्हणून कार्यरत असून माझा जो अनुभव आहे त्यातून तळागाळात सहकार पोहचवण्यासाठी मी काम करेन आपण जी माझी निवड केली ती सार्थकी लावेन. यावेळी नवनिर्वाचित व्हा चेअरमन दीपक इन्सुलकर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page