रुपेश राऊळ यांचा आरोप: येणाऱ्या काळात ठाकरे सेनेच्या माध्यमातून आवाज उठवणार…
⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सकारात्मक होते. परंतु मंत्री दीपक केसरकर यांच्याच नकारात्मक भूमिकेमुळे आज पर्यंत या हॉस्पिटलचा प्रश्न सुटू शकला नाही असा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.
दरम्यान हा प्रश्न न सुटल्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भात आपण ठाकरे सेनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे असे ही राऊळ यावेळी बोलताना म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
