दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हे…

४४ हजार ८०० रुपयांची पकडली दारू

ओरोस ता ८
७ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत विविध तीन ठिकाणी धाडी टाकून अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांकडून ४४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र दारू बंदीअधिनियम 65(ई) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ज्ञानेश्वर कामतेकर याचेकडून 18 हजार 700 रुपये किमतीची, रॉकी इग्रासी फर्नांडीस याचेकडून 19 हजार रुपये किमतीची दोन्ही राहणार तेलीवाडी, कसाल आणि रॉबर्ट फर्नांडीस राहणार नवाबाजार कसाल, ता. कुडाळ यांचेकडून 7 हजार 100 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू अवैध्यरीत्या बाळगून विक्री करीत असताना मिळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page