अमित सामंत :मुक आंदोलन करून निवडणूक आयोगाचा केला निषेध
⚡सावंतवाडी ता.०८-: भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून निवडणूक आयोगावर दबाव टाकून आमच्या पक्षाच नाव काढून घेतल. चिन्ह काढून घेतल .तरी पण लोकांच्या मनातील स्थान शरद पवारांनी मिळवलेले कोण काढू शकत नाही, असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भाजपवर केला आहे.दरम्यान शरद पवार ही आमची निष्ठा आहे. त्यामुळे शरद पवार जो निर्णय घेणार त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार असे सामंत यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलते होते.यावेळी दिलेल्या निकाला विरोधात येथील आंबेडकर पुतळा समोर मुक आंदोलन करून निवडणूक आयोगाच निषेध केला.
यावेळी सामंत पुढे बोलताना सामंत म्हणाले की शरद पवारांनी अनेकांना मंत्री पद दिले मात्र त्यांनी ते उपकार विसरून ते भाजपच्या व इडीच्या दबावाला बळी पडत शरद पवार यांच्यावर खंजीर खुपसून भाजप सोबत हात मिळवणी केली. परंतु ते यशस्वी होणार नाही. किती झाल तरी जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता पेठून उठेल आणी त्यांना जागा दाखवेल असे सामंत म्हणाले.दरम्यान तुम्ही किती ही दबाव टाकला तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबत राहणार असून साहेब जो-जो आदेश देणार त्या त्या पद्धतीने काम करून लोकांच्यात जाऊन आम्ही काम करणार असेही सामंत यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी प्रवीण भोसले, अर्चना घारे, प्रसाद रेगे, भास्कर परब, देवा टेंमकार, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर, सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, पुंडलिक दळवी सुहास कुडाळकर, सलीम नाबर, तैसीब आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर, वैभव परब,याकुब शेख, अवधूत मराठे,प्रशांत पांगम आदी उपस्थित होते.
