एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत आरपीडीचे यश…

योगेश जोशी राज्यस्तर प्रथम, भावेश राऊळ जिल्हास्तर प्रथम तर तन्वी दळवी तृतीय…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत आरपीडी प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या कु. योगेश विवेकानंद जोशी याने राज्यस्तर प्रथम क्रमांक सलग दुसऱ्यांदा पटकाविला.
यासोबतच आरपीडी प्रशालेचा इयत्ता सातवीतील भावेश सुभाष राऊळ याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक तर इयत्ता सातवीची विद्यार्थी तन्वी प्रसाद दळवी हिने जिल्हास्तर तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, मृदू कौशल्ये गरजेची असतात. पाचवी ते नववीतील एसएससी बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट राज्यस्तरीय ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सरकारमान्य एमएस-सीआयटी केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने आरपीडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेसाठी राज्यभरातून 20000 विद्यार्थी सहभागी झाले होते. या यशाबद्दल या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक पी. एम. सावंत, पर्यवेक्षिका चौककर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, आनंदी कॉप्युटर्सचे संचालक मेघश्याम काजरेकर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page