अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन:बबन साळगावकर यांचा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना इशारा..
⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाट रस्त्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी या घाट रस्त्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली. दरम्यान जर यांच्यावर कारवाई न झाल्यास अचानक आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील साळगावकर यांनी आज येथे दिला.
याबाबत बबन साळगावकर पुढे बोलताना म्हणाले की या घाट रस्त्यांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल असून अनेकांचे या रस्त्याच्या अपघातामध्ये बळी देखील गेले आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी तात्काळ इडीमार्फत करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.दरम्यान आंबोली रस्त्यांसाठी झालेल्या सर्व खर्चाचा तपशील आपल्याला मिळावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. घाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्टर बसवण्यात येतात परंतु ते नंतरच्या काळात कुठेच दिसत नाही. आंबोली घाट रस्त्यासाठी 40 कोटीहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील श्री साळगावकर यांनी यावेळी केला आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक उमेश कोरगावकर,मिहीर मठकर आदी उपस्थित होते
