सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची केली मागणी
⚡सावंतवाडी ता.०१-: राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसवणाऱ्या विविध प्रश्नांबाबत सावंतवाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज तहसीलदार श्रीधर पाटील यांचं लक्ष वेधून त्यांना निवेदन सादर केले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळ मुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून विमा रक्कम दिली जाते. ती नुकसान भरपाई मिळत नाही. नोकरी भरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारणी होत आहे. पेपर फुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणतेही प्रकल्प आणून युवकांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाही. तसेच महाराष्ट्राच्या वाटेचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यात जात आहेत, असे नमूद केले आहे.
