रोहित पवार यांच्या चौकशी विरोधात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक…

ईडी चौकशी केला निषेध:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन..

ओरोस ता.०१-:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्या सुरू झालेल्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक बनली आहे. या विरोधात गुरुवारी जिल्हा आणि तालुका स्तरावर निषेध आंदोलन करून प्रशासनाला निवेदने देण्यात आली. जिल्हा स्तरावर निषेध करीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.


यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भास्कर परब, शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर, रुपेश जाधव, सचिन पाटकर, सच्चिदानंद कन्याळकर, दिवाकर मुरकर, नयन गावडे, शंकर चिंदरकर, चंद्रकांत नाईक, बबलू गावडे, विनायक गावडे, अक्षय मराठे, प्रसाद गावडे, गौरव गावडे, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते. सुरुवातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी तावडे यांना निवेदन देण्यात आले.

You cannot copy content of this page