वाफोली येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न…

⚡बांदा ता.३१-: जिल्हा नियोजन २०२२-२३ मधून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार राजन तेली यांच्या प्रयत्नातून वाफोली येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन माजी सभापती तथा बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच मारूती गवस, शिवाजी गवस, देवस्थान अध्यक्ष विलास गवस, चेअरमन धनश्री गवस, व्हा. चेअरमन अनिल गवस, ग्रा. सदस्य साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, उल्हासिनी गवस, राजेंद्र सिताराम गवस, अजय गवस, प्रदीप आयकर, जयदेव गवस, बबन आना गवस, विठ्ठल गवस, चंद्रकांत आईर, मंगेश सावंत, रामदास गवस, उदय गवस, सखाराम गवस, राजन गवस, संजय गवस, राजेश गवस, विधी गवस, वैभवी देसाई, दशरथ आईर, सद्गुरू आईर, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वाफोली ग्रामपंचायतच्या वतीने प्रमोद कामत यांचा माजी सरपंच शिवाजी गवस, मारुती गवस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या रस्त्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रमोद कामत यांनी यावेळी सांगितले की, यापुढे महायुतीच्या माध्यमातून खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून वाफोली गावातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू.

You cannot copy content of this page