अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश: जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले स्वागत..
⚡कुडाळ ता.३१-: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख श्री.सागर तुळसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्ते श्री.सिद्धेश सावंत,श्री.गौरव फोंडके,श्री.शंकर पारकर,श्री. फाळके,श्री.सचिन फाळके,श्री भूपेंद्र पारकर,श्री.रणजित सावंत,श्री.दर्शन पारकर,श्री.सिद्धेश प्रभू,श्री.किशोर राऊळ,श्री.नितेश शेडगे,आदित्य राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
व आपण शिवसेना पक्षाची धेय्य धोरणे लोकांपर्यंत पोहचवून त्यांचा प्रचार प्रसार करू अशी ग्वाही यावेळी प्रवेशकर्ते यांनी दिली यावेळी शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.संदेश सावंत पटेल,शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख सौ.आराध्या करलकर मॅडम, विभागप्रमुख श्री.जयदीप तुळसकर,श्री.चैतन्य कुडाळकर,श्री.रामकृष्ण गडकरी मामा,रत्नाकर जोशी,युवा कार्यकर्ते श्री.अनिकेत तेंडुलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
