⚡बांदा ता.३१-: भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत पडवेमाजगाव येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पतंजली योगसमिती सिंधुदुर्गचे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत स्वाभिमानचे माजी जिल्हाप्रभारी महेश भाट यांनी भूषविले. यावेळी भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग माजी सहजिल्हा प्रभारी प्रकाश रेडकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी रावजी परब, भारत स्वाभिमान सावंतवाडी सह तहसिल प्रभारी स्वानंद पवार, युवा भारत सावंतवाडी तहसील प्रभारी मयुरेश गवंडळकर, सोशल मीडिया सावंतवाडी तहसील प्रभारी लक्ष्मण पावसकर, सोशल मीडिया सावंतवाडी सह तहसील प्रभारी लाडोबा देसाई, किसान सेवा समिती सह तहसील प्रभारी संतोष मोरे, पडवे माजगाव योगकक्षा प्रमुख सुशांत देसाई, शेखर गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी योगसाधकांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळी 5:30 ते 7:00 आणि संध्याकाळी 7:00 ते 8:30 या वेळेस दररोज एक महिना शिबिर चालू राहील.
घराघरात योगाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे दैवी आणि ईश्वरीय कार्य करण्याची सुवर्णसंधी म्हणजेच सहयोग शिक्षक प्रशिक्षण आहे आणि त्यामुळे सर्व जनतेने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन उदघाटक शेखर बांदेकर यांनी यावेळी केले. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी 9823881712 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
