सावंतवाडी संस्थान मराठा समाज तर्फे ११ फेब्रुवारी रोजी बांदा येथे वधू वर मेळाव्याचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित सावंतवाडी आणि कुडाळ समिती तर्फे वधू वर परिचय मेळावा रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी बांदा येथे आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील यंदा कर्तव्य असलेल्या युवक- युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी संबंधितांनी सदर मेळाव्यात सहभागी होऊन नोंदणी करावी ही विनंती.
दहावी व बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या मुलींसाठी येथे विशेष नोंदणी करण्यात येणार आहे. हा मेळावा बांदा गृप वि. का. स. सेवा सोसायटी लिमिटेड बांदा सभागृह, बांदेश्वर मंदिर जवळ येथे सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. अधिक माहितीसाठी नारायण (बाळू) गावडे ९४२१०३७३२९, भरत गावडे ९४०३०८७७९६, प्रल्हाद सावंत ९४२३३०४५१६, सौ. मेघना राऊळ ९४२३२१९७८१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page