एकाच दिवशी दोन पुरस्कार पटकावणारे युवा अभिनेते गजेंद्र शाम कोठावळे

⚡बांदा ता.३१-:
इन्सुली येथील अभीनेते राहून गजेंद्र कोठावळे यांना त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून एकाच दिवशी दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार आणि सर्वद फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा स्टार अभियान पुरस्कार यांचा समावेश आहे.
इन्सुली सारख्या छोट्याश गावात राहून त्यांनी आपल्या अंगातील कलेची आवड जोपासली. नाटक, भजन यामधून स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी चक्क टीव्ही मालिकेपर्यंत पर्यंत मजल मारली. एवढेच नव्हे तर अनेक राज्यस्तरीय रिल्स स्पर्धांमध्येही त्यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आणि एकपात्री अभिनयामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हे सर्व करत असताना त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांना यश येऊन या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक नव्हे तर एकाच दिवशी दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या यशामुळे विविध स्तरांतून गजेंद्र यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page