शिवसेना शिंदेची या महत्वपूर्ण निकालानंतर सावंतवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.१०-: सत्ता संघर्षावर शिवसेना शिंदेचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिंदाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो दीपक भाई केसरकर आगे बढो या घोषणा देण्यात आल्या
सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिधर आपारमेंट कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यामध्ये जिल्हाप्रमुख अशोक दळवी महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर दत्ता सावंत आबा केसरकर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर नंदू शिरोडकर नंदू गावडे श्री बांदेकर सदा कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांना नंदू गावडे यांनी पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला

You cannot copy content of this page