माऊली कर्णबधिर, मतिमंद निवासीविद्यालयाचे 12 रोजी स्नेहसंमेलन…

⚡बांदा ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय व माऊली मतिमंद निवासी विद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. पारिजात मंगल कार्यालय येथे होणार आहे. कार्यक्रमास दांडेली सरपंच निलेश आरोलकर, सावंतवाडी सहकारी संस्था सहायक निबंध उर्मिला यादव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व्ही.एन. ठाकूर, वै.सा.का. समाजकल्याण विभागाचे जी.एस. हुक्कीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरोडा माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा गायकवाड, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश उकरंडे व माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page