युवा नेते विशाल परब यांचे आयोजन ; नाव नोंदणी न झालेल्यांनाही मिळणार संधी..
⚡सावंतवाडी ता.१०-: भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर १२ जानावारीला होणार्या भव्य अशा सिंधूरत्न जाॅब फेअरची जोरदार तयारी सुरु असून मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
तर आत्तापर्यंत मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी या जाॅब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली असून याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता विशाल परब मित्र परिवाराकडून या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले जात आहे. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करतांना अडचणी आल्या त्यांनीही आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह या फेअरमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही श्री परब यांनी केले आहे.
