ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवनीत परब प्रथम…

⚡मालवण ता.०८-: कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सायन्सचा विद्यार्थी नवनीत परब याने सप्टेंबर २०२३ मध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने आयोजित केलेल्या विज्ञान आणि मानकांवर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला होता, या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावित सुयश मिळविले.

या यशाबद्दल नवनीत परब याचे तसेच मार्गदर्शक शिक्षक, त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणारे वडील डॉ. सोमनाथ परब यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व पदाधिकारी, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page