विकसित व आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:लाभार्थी, ग्रामस्थ व विध्यार्थी यांच्याशी साधला संवाद..

⚡मालवण ता.०८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने जनकल्याणाच्या 54 योजना देशभरात व्यापक पद्धतीने तळागळापर्यंत राबवल्या जात आहेत. कोट्यावधी जनतेला लाभ दिला जात आहे. सुख, समाधान आणि आनंदाने नागरिक जिवन जगले पाहिजेत या सोबत विकसित व आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान यांचे लक्ष आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देऊळवाडा येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात बोलताना केले.

मोदी सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा मालवण तालुक्यातील देऊळवाडा शाळा येथे सोमवारी दाखल झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. विविध योजनेची माहिती देताना लाभार्थी यांना लाभ कार्ड वितरतीत करण्यात आले. तसेच शालेय विध्यार्थी यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

यावेळी विकासयात्रा झोनल अधिकारी, अशोक कदम, नोडल अधिकारी अंकित कुमार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिप माजी अध्यक्ष सरोज परब, तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सरपंच सुरेखा वायंगणकर, बिळवस सरपंच मानसी पालव, श्री भोगले, संतोष पालव, भास्कर मांजरेकर यासह भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, छोटू ठाकूर, विजय निकम अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी तसेच मुख्याध्यापक प्रवीण पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.

यावेळी अंकिता मेस्त्री यांनी आयुष्याम योजना बाबत माहिती दिली. डॉ. वीणा मेहंदळे यांनी आरोग्य विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

You cannot copy content of this page