साईश गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.०३-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांचा लाईव्ह काॅन्सर्ट आयोजित केला होता,या लाईव्ह काॅन्सर्ट चे सर्वोत्कृष्ट शूट करुन रील बनविल्या बद्दल साईश सीताराम गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
साईश गावडे हा येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा बारावी सायन्सचा विद्यार्थी असून तो गेली दोन वर्षे आवड म्हणून रील बनवतो, सावंतवाडी शहरातील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांना त्याच्या व्यवसायाच्या रील बनवून दिल्या आहेत.
जिमखाना येथील विशाल पर्व,मराठा रॅली,श्रावण राजवाडा उत्सव,दहीहंडी अशा असंख्य रील बनवून साईश याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.विशाल परब यांच्या संपूर्ण कार्यक्रमाची सर्वोत्कृष्ट रील बनविल्या बद्दल साईश याचा विशाल परब यांनी आपल्या कार्यालयात शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार केला, याप्रसंगी साईशचे वडील सीताराम गावडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page