आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले कामांचे भूमिपूजन..
⚡कणकवली ता.०३-: खारेपाटण जि. प. विभागातील साळिस्ते गावात श्री देव रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू ७ लाख,हायवे ते साळिस्ते बुरंबावडे रोड बौध्दवाडी येथे ब्रिज बांधणे रू ६० लाख. हायवे ते गुरववाडी येथे साकव बांधणे रू ४० लाख.अशा कामांना आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर केला आहे.एकूण १ कोटी ७ लाख विकास निधी दिला आहे.
त्यासाठी जि. प .माजी वित्त बांधकाम सभापती बाळा जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर व तालुका अध्यक्ष संतोष कानडे, विधानसभा भाजपा सोशल मिडीया प्रमुख मयुरेश लिंगायत यांच्या पाठवुराव्याने हा निधी आम.नितेश राणे यांनी दिला आहे.या कामांची मागणी भाजपा साळिस्ते बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर व साळिस्ते ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आली होती. या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्याला सरपंच प्रभाकर ताम्हणकर,माजी सरपंच राधाबाई गुरव,माजी सरपंच चंद्रकांत हरयान, माजी उपसरपंच बाळा पाटील, रामचंद्र गुरव ग्रामपंचायत सदस्या सौ मानसी बारस्कर, सौ सीमा गुरव, हर्षदा ताम्हणकर, तेजल पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश साळिस्तेकर, अनंत गुरव,अनिल ताम्हणकर,बबन कांजीर, हिम्मत कांबळे, अनंत बारस्कर, दिनेश कांबळे, पप्या मेस्री, ई.ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात एकाच वेळी १ कोटी ७ लाख रूपये एवढा मोठा निधी साळिस्ते गावाला प्रथमच मिळाल्या बद्दल संपूर्ण गावच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी जिल्हा परिषद वित्त बांधकाम सभापती बाळा जठार, व माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, शक्ती प्रमुख राजेश जाधव यांचे भाजपा बुथ कमीटी अध्यक्ष
उदय बारस्कर मंगेश कांबळे व भाजपा उपसरपंच जितेंद्र गुरव,यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व साळिस्ते ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
