⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील आचरा गावचे सुपुत्र आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले चित्र कलावंत आशिष इरप यांच्या वेट वाईब्ज या चित्रकलाकृतीला इटलीतील वेनीस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल मध्ये मानाचा ,एक्सलन्स पुरस्कार सन्मान, प्राप्त झाला आहे त्यांना या वेनीस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल मध्ये विशेष निमंत्रण देऊन गौरविण्यात आले
व्हेनिस वॉटर कलर फेस्टिवल मध्ये यंदा जगभरातून जवळपास बाराशे पेक्षा जास्त कलाकृती सहभागी झाल्या होत्या लँडस्केप निसर्ग चित्र प्रकारात आशिष इरप यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील प्रवासी वातावरणाचे चित्र साकारले त्याला पुरस्कार देताना त्यांनी साकारलेली मनमोहक रंगसंगती प्रकाश योजना व वाटर कलर मधील त्यांचे प्राविण्य यांचा विशेष उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे आचरा ग्रामस्थांकडून ,पिरावाड हायस्कूलचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कोळंबकर आदींनी अभिनंदन केले आहे.
