ग्लोबल तर्फे पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्रदान…

⚡मालवण ता.०३-: ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेतर्फे चौके येथील भ.ता. चव्हाण, म.मा.विद्यालय चौके विद्यालयातील पाच हुशार व होतकरू गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक विकासासाठी नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये कु.योगिता चव्हाण, कु.केशव चव्हाण, कु.अमिता चव्हाण, कु विकास नाईक आणि कु.पारस मानवर या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये रोख रक्कम जमा करण्यात आली.

गेली अनेक वर्षे ग्लोबल फाउंडेशन पिंगळी या संस्थेतर्फे हुशार होतकरू विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आर्थिक मदत दिली जाते.अनेक विद्यार्थ्यांनी या मदतीचा फायदा आपल्या शैक्षणिक विकासासाठी करून घेतला आहे. ग्लोबल फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद परब तसेच गुरु देसाई व अन्य सहकाऱ्यांच्या सहयोगातून शाळेमध्ये नेत्र तपासणी शिबिर सुद्धा भरविले जाते.त्याचा फायदा जिल्यातील अनेक शाळतील विद्यार्थ्यांना होतो.

यावेळी चौके भ.ता.चव्हाण, म. मा.विद्यालय स्थानिक समिती अध्यक्ष श्री. बिजेंद्र गावडे मुख्याध्यापिका सौ.रसिका गोसावी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांनी या मदतीबद्दल ग्लोबल फाउंडेशन संस्थे प्रती आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page