वाहनचालकांचा संपाचा परिणाम
⚡कणकवली ता.०२-: मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात पेट्रोल-डिझेल चालकही उतरले आहेत. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातूनच अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची एकच गर्दी उसळली आहे. कणकवलीत इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांचा संपाचे परिणाम दिसून येत आहेत.नाईक कंपनीच्या पेट्रोल,डिझेल पंपावर मोठी गर्दी उसळली आहे. तर पोलीस विभागाच्या पेट्रोल पंपावर ठणठणाट दिसून येत आहे.तसेच अन्य पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल कमी आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे.
