⚡बांदा ता.०२-: रोणापाल खेरकटवाडी भरडवाडी रस्त्यासाठी 10 लाख रुपये, ख्रिश्चनवाडी रस्ता 6 लाख 50 हजार रुपये व ख्रिश्चनवाडी येथे थ्री फेज लाईन टाकण्यासाठी 1 लाख असा एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा निधी विविध माध्यमातून मंजूर झाला असल्याचे रोणापाल सरपंच योगिता केणी यांनी सांगितले.
गावातील ग्रामस्थांच्या मागण्या प
पूर्ण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून रोणापाल गावासाठी भरघोस निधी मंजूर केला. प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी काही वेळ लागणार असून काम दर्जेदार करून घेतले जाईल असा विश्वास सरपंच योगिता केणी यांनी व्यक्त केला.
रोणापाल गावासाठी वीस लाखांचा निधी मंजूर : सरपंच योगिता केणी
