व्यापार उद्योगात प्रगती साधत व्यापाऱ्यांनी मालवणचे नाव उंचवावे…

उमेश नेरुरकर:मालवण व्यापारी संघाच्या कार्यालयाचे उदघाटन..

⚡मालवण ता.०२-: मालवण व्यापारी संघाच्या कार्यालयाद्वारे एक नवीन सुरुवात होत असून व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापार उद्योगात प्रगती साधून मालवणचे नाव उंचवावे. तसेच ३१ जानेवारी रोजी मालवणात होणारा जिल्हा व्यापारी मेळावा यशस्वी करण्यासाठी मालवणातील व्यापाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन मालवम व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मालवण बाजारपेठ येथे मालवण व्यापारी संघाच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.

मालवण बाजारपेठ येथे मालवण व्यापारी संघाच्या कार्यालयाचे उदघाटन ज्येष्ठ व्यापारी मसउद मेमन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, जिल्हा व्यापारी संघांचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, रवींद्र तळाशीलकर, गणेश प्रभूलकर, अभय कदम, प्रमोद ओरसकर, सुहास ओरसकर, हर्षल बांदेकर, प्रसाद गाड, नाना साईल, कवटकर, बाळू अंधारी, बाळा आचरेकर, शेखर अंधारी, महादेव पाटकर, प्रभाकर देऊलकर, मंदार ओरसकर, हिमांशू पटेल, प्रसाद दहा धारगळकर, हरेश देऊलकर, संदीप शिरोडकर, अरविंद सराफ, भाऊ साळगावकर, मुकेश बावकर, कुलराज बादेकर, भालचंद्र कवटकर, गोपाळ कारेकर, पूजा वाडकर, दीपक बिरमोळे, सुमित कवटकर, अखिलेश शिंदे, करण खडपे, सुशांत तायशेटे, पुष्कर तायशेटे आदी व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व व्यापारी बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी नितीन तायशेटे म्हणाले, मालवण मध्ये होणारा जिल्हा व्यापारी मेळावा एक उत्सव म्हणून साजरा करतानाच मालवणातील व्यापाऱ्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने मालवणचा व्यापार मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. मालवणची बाजारपेठ मोठी होत आहे. ग्राहकांची मानसिकता बदलत आहे. काळानुसार व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापार, उद्योगात बदल घडविले पाहिजेत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन गणेश प्रभूलकर यांनी केले.

You cannot copy content of this page