गोवा बनावटी दारु वाहतुक प्रकरणी संशयीत आरोपिंची जामीनावर मुक्तता …

⚡सावंतवाडी ता.२९-: गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही संशयीत आरोपिंची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय जाणाऱ्या महामार्गांवर २० डिसेंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ यांनी रक्कम रुपये
१ कोटी १४ लाख १० हजार रुपयांचा गोवा बनावटीचा
मद्यसाठा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी जयंतीलाल सोमाभाई मकवाना व नटूभाई मोहनभाई राठोड, (दोन्ही रा. राजकोट, गुजरात) यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदीकायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करुन सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यावेळी आरोपी तर्फे अड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी आरोपी यांना पुन्हा सावंतवाडी न्यायालयात हजर करुन दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीतर्फे अड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून सरकार पक्षातर्फे करण्यात आलेली पोलीस कोठडीची मागणी नाकारुन आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मंजूर करण्यात आली. त्यानंतर आरोपी तर्फे न्यायालयात अड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करून, त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य मानून वरील दोन्ही आरोपिंची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page