विद्यार्थ्यांनी घेतला ‘ मास्टर शेफ ‘ बनण्याचा आनंद …
⚡सावंतवाडी ता.२९-: सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत गुरुवार
दि . २८ – १२ – २०२३ रोजी आरोग्यदायी पाककला कृती बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेतील केजी विभाग व इ. १ली ते १०वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात विविध चविष्ट पदार्थ बनवले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या व फळे वापरून सँडविच , रिबन सँडविच ,फळांचे ज्यूस, ब्रेड केक , ब्रेड पिझ्झा , मोनॅको सँडविच , फ्रुट स्टिक ,फ्रुट सलाड, मिनी बर्गर, पनीर बर्गर , वेफर चाट , भेळ, रसमलाई , दाबेली ,पाणीपुरी , शेवपुरी , मिल्कशेक , कोल्ड कॉफी, लिंबू सरबत , व्हेज फ्रॅन्की , ओरिओ डेझर्ट , ओरओ स्विस रोल , ऑरेंज ज्यूस , केक, सुक्या मेव्याचे लाडू , डोनट इ . पदार्थ शिक्षकांच्या मदतीने बनवले . तसेच विद्यार्थ्यांनी या पदार्थांची सुंदर सजावट करून अतिशय चांगल्याप्रकारे त्यांचे सादरीकरण केले.
यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .
