नेरुर गावातील 15 गवताच्या गंजीना आग लागल्याचे आणून दिले निदर्शनास
कुडाळ ता.२७-: आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांची भेट घेत नेरुर गावातील गवताच्या 15 गंजीना आग लागल्याचे निदर्शनास आणले. तहसीलदार अमोल पाटक यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवून आग लागलेल्या गवताच्या गंजीचे पंचनामे केले असल्याचे सांगितले व जास्तीत जास्त मोबदला मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही दिली. तसेच जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जास्तीत मोबदला मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपस्थित ग्रामस्थ यांना दिली. यावेळी सुधाकर रघुनाथ घाडी, रमेश रघुनाथ घाडी आदी उपस्थित होते.
