सावंतवाडीत १२ जानेवारीला “सिंधूरत्न जॉब फेअर” चे आयोजन…

विशाल परब यांचा पुढाकार ; राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे 50 कंपन्यांचा सहभाग ; प्रभाकर सावंत यांची माहीती..

⚡ओरोस ता.२७-:* कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी १२ जानेवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर सकाळी ९ ते ५ या वेळेत सिंधूरत्न जाॅब फेअर २०२४ चे आयोजन केले आहे याबाबतची माहीती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ओरस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या जॉब फेअर मध्ये महाराष्ट्रातील तब्बल 50 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत जॉब केअर मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देणार असल्याचे यावेळी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल  परब यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page