निवृत्त पोस्ट मास्तर कृष्णकुमार प्रभू यांचे निधन…

⚡मालवण ता.२६-: बांदिवडे येथील मूळ रहिवासी आणि सद्यस्थितीत कणकवली कलमठ येथे वास्तव्यास असणारे निवृत्त पोस्ट मास्तर तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार मारुती प्रभू (वय ७९) वर्षे यांचे रविवारी निधन झाले.

कृष्णकुमार प्रभू यांनी चाळीस वर्ष पोस्ट ऑफिस मध्ये सेवा केली होती. २००५ मध्ये पोस्ट मास्तर म्हणून कणकवली पोस्ट कार्यालयातून ते सेवानिवृत्त झाले होते .

कृष्णकुमार प्रभू यांनी पोस्टल युनियन संघटना सिंधुदुर्गचे पंधरा वर्षे अध्यक्ष पद तसेच बांदिवडे देवस्थान अध्यक्ष पद, नाम सप्ताह मंडळ बांदिवडे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. अनेक समाज सेवा संघटनांमध्ये ते कार्यरत होते. बांदिवडे गावच्या विविध धार्मिक, कला, क्रीडा, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. विविध विकासात्मक कामांचाही त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद प्रभू , भूषण प्रभू आणि कृषी पर्यवेक्षक प्राची सावंत यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page