कुडाळ :
वेताळ बांबर्डे भोगलेवाडी येथील रविकांत न्हानू राणे ३२ याने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 25 डिसेंबर रोजी दुपारी 2 वा घडली.
यातील रविकांत न्हानू राणे याने घरात कोणीही नसताना घरातील मधल्या खोलीतील लोखंडी बारास गळफास लावून घेतला. यानंतर त्यांचा मोठा भाऊ आनंद हा कामावरून घरी आल्यावर त्याला रविकांत न्हानू राणे हा घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. यानंतर त्याने रविकांत याला लोकांच्या मदतीने खाली उतरून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची फिर्याद एकनाथ शंकर भोगले वेताळ बांबर्डे भोगलेवाडी यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार दयानंद चव्हाण हे करत आहेत.अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.मात्र या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
वेताळ बांबर्डे येथील युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या…
